आयफोन प्रेमी दरवर्षी सप्टेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण अँपल कंपनी आयफोनचं नवीन मॉडेल नव्या फिचरसह सप्टेंबर महिन्याच्या आसपास लाँच करते. आता याच आयफोन लव्हर्सची यावर्षीची प्रतिक्षा संपलीये. १२ सप्टेंबरला अँपलचा वार्षिक इव्हेंट पार पडला. यामध्ये आयफोनचे ४ मॉडल्स लाँच करण्यात आले. यातच अँपलने सगळ्या आयफोन्समध्ये एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्याची सरगळीकडेच चर्चा सुरू आहे. तर ती सुविधा नेमकी कोणती आहे? आयफोन्सच्या मॉडेल्सची किंमत किती असणार आहे आणि यात कोणकोणती वैशिष्ट्य असणार आहेत? हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत... नमस्कार मी किरण गिते. तुम्ही पाहताय मुंबई तक...