ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीने समन्स बजावलंय. बुधवारी म्हणजे ८ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पेडणेकरांना देण्यात आले आहेत. आता यावरून शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये ट्विटरवॉर सुरू झालाय. म्हात्रेंनी पेडणेकरांवर बोचरी टीका केलीये तर पेडणेकरांनी त्यावर सडकून प्रत्युत्तर दिलंय. नेमकं काय झालंय? हेच आपण य़ा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.