ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साधला देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सतत सत्ताधाऱ्यांना विशेषतः भाजप आणि फडणवीसांना लक्ष्य करताना दिसतात. सुषमा अंधारे सरकारला विविध भूमिका आणि धोरणांवरून कात्रीत पकडत असतात. आता अंधारेंनी नवा मुद्दा मांडलाय. त्यांनी एक व्हिडिओ एक्स या समाज माध्यमावर शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधलाय. या व्हिडिओमुळे राज्यभरात एकच खळबळ माजलीये. आता तो व्हिडिओ नेमका काय आहे? अंधारेंनी पोस्टमध्ये काय लिहिलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया