उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवरून आमदार रोहित पवार यांनी सुनावले खडेबोल
पवार कुटुंबाविषयी मनात येईल ते बोलणाऱ्या आमदाराचं नाव महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्या आमदाराबद्दल आता तुम्हालाही कल्पना आलीच असेल. गोपीचंद पडळकर! पडळकर पुन्हा एकदा पवार कुटुंबाबद्दल बोललेत. ज्या भाजपसोबत असलेल्या अजित पवारांनाही पडळकरांनी सोडलं नाही. त्यामुळंच राष्ट्रवादी पडळकरांविरुद्ध आक्रमक झालीये. रोहित पवारांनाही अजित पवारांची बाजू घेत पडळकरांना खडेबोल सुनावलेत. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही रोहित पवारांनी खडा सवाल केलाय... आता हे प्रकरण काय आणि त्याची सुरुवात कशी झाली तेच समजून घेऊयात